केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे-मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे
केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं याचा निर्णय आपल्याला घ्यायचा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आपण केलं की पाप आणि त्यांनी केलं की पुण्य, असा टोला केंद्र सरकारच्या भूमिकेवरून त्यांनी लगावला. तसेच जनतेचा आवाज कोणी दाबू शकत नाही आणि जर तो दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो अजून बुलंद करणं आपलं कर्तव्य आहे असंही यावेळी ते म्हणाले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत आपले मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले.
www.konkantoday.com