
गणपती विसर्जनाचे वेळी नदीपात्रात वाहुन गेलेल्या रायपाटण येथील तरूणाचा मृतदेह सापडला
गणपती विसर्जनाचे वेळी नदीपात्रात वाहुन गेलेल्या रायपाटण येथील अक्षय शेटये या तरूणाचा मृतदेह तब्ब्ल 16 तासानंतर अर्जुना नदी पात्रात आढळून आला आहे.अक्षय हा गणपती विसर्जना साठी उतरला होता त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तालु्यातील रायपाटण येथील बाजारवाडी ह्या ठिकाणचा अक्षय दिलीप शेट्ये (23) राह. रायपाटण बाजारवाडी हा तरुण घरचा गणपती विसर्जन करण्यासाठी रायपाटण येथील अर्जुना नदीच्या पात्रात उतरला असता घोडकोंड (बाजारवाडी ) या नदीत वाहून गेला होता. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान ही दुर्घटना घडली होती.
याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ त्याचा शोध घेण्यात आला. मात्र अंधार पडल्याने शोधकामात अडथळा येत होता. सकाळी पुन्हा ही शोध मोहिम हाती घेण्यात आली. सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान तो बुडाला त्याच परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
www.konkantoday.com