अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आज होण्याची शक्यता
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय आज (ता.२८) येण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्र, दिल्ली आणि ओडिशाने कडाडून विरोध केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेण्यावर ठाम असल्याने हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. परीक्षा घेण्यावरून थेट दोन गट पडल्याने राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा निर्णय असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे आहे.
www.konkantoday.com