सदनिका खरेदी-विक्रीला चालना मिळण्यासाठी मुद्रांक शुल्कात निम्मी कपात करण्याचा निर्णय
करोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने ठप्प झालेल्या सदनिका खरेदी-विक्रीला चालना मिळण्यासाठी मुद्रांक शुल्कात निम्मी कपात करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे घर खरेदीदारांसह बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोनाचे संकट येण्यापूर्वीच बांधकाम व्यवसायाला घरघर लागली होती. टाळेबंदीमुळे या व्यवसायाचा डोलारा कोसळला. त्यामुळे मुद्रांक शुल्क कमी करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांसह विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी सध्याचा प्रचलित मुद्रांक शुल्क दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिहस्तांतरणपत्राच्या दस्तावरील प्रचलित मुद्रांक शुल्काचा दर १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीकरिता तीन टक्के , तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता दोन टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com