विविध फणसापासून लांजा येथे साकारण्यात आलाय कोकणातील इकोफ्रेंडली गणपती,देसाई कुटुंबियांचा नाविन्य पूर्ण प्रयोग
लांजा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र देसाई व त्यांचे चिरंजीव मिथिलेश देसाई यांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात फणसापासून साकारण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. फणसकींग म्हणून ओळख असलेल्या देसाई यांच्या या गणपतीचे दर्शन सोशल मिडियाद्वारे महाराष्ट्राला होत आहे.
यंदा कोरोनाचे संकट पाहता खबरदारी म्हणून गणेशोत्सव घरच्या घरी साजरा करण्याचे ठरले. इकोफ्रेंडली उत्सवाकडे वाटचाल करीत असताना फणसाचाच गणपती ही नवी संकल्पना पुढे आली आणि तसा गणपती तयार करण्यात आला. आता या श्रींना आपण इकोफ्रेंडली वा ऑरगॅनिक गणपती असे नाव देऊ शकतो असे हरिश्चंद्र व मिथिलेश देसाई या पितापुत्रांनी सांगितले.
www.konkantoday.com