
राज्यात काल नव्याने १४ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
राज्यात काल नव्याने १४ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. काल केवळ ७,६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. काल १४ हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढविल्यानंतर अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १, ७२, ८७३ झाली आहे.
काल ७,६३७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ५,२२,४२७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.६९ % एवढे झाले आहे.
काल राज्यात १४,८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ % एवढा आहे .
www.konkantoday.com




