
जैतापूर येथे मिनीबस डेपोसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची ग्वाही
सागरी महामार्गावरील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जैतापूर येथे मिनीबस डेपोसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची ग्वाही पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी दिल्याने जैतापूरमध्ये लवकरच मिनी बस डेपो उभारण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. पालकमंत्री ना. परब यांच्याकडे सागवे महिला विभाग संघटिका शैलजा सुहास मांजरेकर यांनी नुकतीच या प्रलंबित प्रस्तावाच्या पूर्ततेसाठी निधीची मागणी केली होती.
www.konkantoday.com