कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालत भक्तीमय वातावरणात गौरी-गणपतींना निरोप
खेड . कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालत भक्तीमय वातावरणात गौरी-गणपतींना निरोप ना ढोल ताशा, ना मिरवणुक परंतू श्रद्धापुर्वक भक्तीमय वातावरणात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. आज
तालुक्यातील १० हजार सहाशे ७७ घरगुती गणपतींसह शहरातील मुरली मनोहर, भरणे येथील संघर्ष मित्रमंडळ व कळंबणी
येथील जय गणेश मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणरायांचे विसर्जन करण्यात आले. दरवर्षी गौरी-गणपतींच्या विसर्जनादरम्यान
एक वेगळाच माहोल असतो. ढोल ताशांच्या गजरात गणरायांच्या विसर्जनाच्या मिरवणूका निघतात. जगबुडी व नारिंगी नदीवरील गणेश विसर्जन घाटांवर रात्री उशीरापर्यंत विसर्जन सोहळा असतो. मात्र यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने ना मिरवणुक, ना ढोल ताशांचा गरज परंतू भक्तीमय वातावरणात श्रद्धापूर्वक गणेशभक्तांनी गौरी-गणपतींना निरोप
दिला. जगावर आलेले कोरोनाचे संकट दुर कर असे साकडे या वेळी भक्तांनी विघ्नहर्त्याला घातले. जगबुडी नदीच्या गणपती विसर्जन घाटावर नगरपरिषदेने चोख व्यवस्था ठेवली होती.
ग्रामीण भागातही गावातील विसर्जन घाटांवर लाडक्या बाप्पाला आणि गौराईना निरोप देण्यात आला .
www.konkantoday.com