कापसाळ येथील महामार्गाचे खड्डे भरले
शहरालगतच्या कापसाळ गोरिवलेवाडी येथील महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते भूषण कांबळी यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्याची गंभीर दखल घेत ठेकेदाराने ते खड्डे तात्काळ बुजविले.
कापसाळ गोरिवलेवाडी येथील महामार्गाची पार दुर्दशा झाली होती. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने छोटे मोठे अपघात घडत होते. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत.
www.konkantoday.com