मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ खात्यातील केवळ १३२ कोटी म्हणजेच २४.४३ टक्के रक्कमच खर्च

करोनाच्या साथीला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा उभारणे आणि विविध कामांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ हे खाते सुरू केल्यावर नागरिकांच्या देणग्यांतून त्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी केवळ १३२ कोटी म्हणजेच २४.४३ टक्के रक्कमच खर्च केल्याची बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम आणि वाटप केलेल्या रकमेचा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितला होता. त्यावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ५४१.१८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button