जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार
यंदाच्या जेईई (JEE) मुख्य आणि नीट (NEET) परीक्षा या यापूर्वी जाहीर केलेल्या तारखांप्रमाणेच होतील अशी घोषणा राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) केली आहे. त्यामुळे आता जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होईल. यापूर्वी या परीक्षा जुलै महिन्यात होणार होत्या मात्र, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळं ती स्थगित करण्यात आली होती.
www.konkantoday.com