कंत्राटी वाहनचालक दोन महिने पगारापासून वंचित
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत कोणतेही सुरक्षा कवच नसताना देखील लांजा येथील अहोरात्र रूग्णसेवा बजावणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी चालक गेल्या दोन महिन्यांपासून हक्काच्या पगारापासून वंचित राहिले आहेत. ऐन गणेशोत्सवात हे चालक पगाराच्या प्रतिक्षेत असूनही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदाधिकार्यांनी या गंभीर प्रश्नाकडे अद्यापही लक्ष दिलेले नाही.
www.konkantoday.com