रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने लॉकडाऊन करायचा की नाही या बाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील- नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्यामुळे जिल्ह्यात परत लॉकडाऊन होणार का असा प्रश्न आज पत्रकारांनी आमदार उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता याबाबत दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील त्यांच्याशी आपले बोलणे झालेले नाही मात्र जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा निर्णय होऊ शकतो कारण ही चैन ब्रेक होणे आवश्यक आहे मात्र याबाबत दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे परंतु हे मृत्यू ही वर्गवारी केली तर 75 टक्के मृत्यू हे 65 वर्षावरील रुग्णांचे झाले असून त्यांना इतर आजारांची ही पार्श्वभूमी आहे तरीदेखील मृत्यूचा दर कमी करण्यासाठी टॉक्स फोर्स शी चर्चा करून जिल्हाधिकारी निर्णय घेतील तसेच पुढील काळात कोरोनाच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांची आवश्यकता असल्यास त्याबाबतही निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com