
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना स्वाभिमान टिकविण्याचा सल्ला दिला
_महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन तिढा कायम आहे. भाजपकडून राज्यसभेचे खासदार नारायण ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या जागेसाठी आग्रह केला जातोय.मंत्री उदय सामंत यांचे बंधू ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभक नाईक यांनी लोकसभा लढवण्यावरुन खोचक सल्ला दिलाय. शेवटच्या टप्प्यात उमेदवारी मिळत असेल तर घेऊ नका. स्वाभिमान जपा, असा खोचक सल्ला वैभक नाईक यांनी नारायण राणे यांना दिलाय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे मेळावे घेऊन या मतदारसंघात उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचं सांगत आहेत. भाजप दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी जाहीर करते. मात्र राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही. त्यामुळे राणेंनी आपला स्वाभिमान या जागेसाठी विसर्जित केला आहे, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच वैभव नाईक यांनी राणेंना स्वाभिमान टिकविण्याचा सल्ला दिला आहे. आता शेवटच्या टप्प्यात जर राणेंना उमेदवारी मिळाली तर ती त्यांनी घेऊन नये. उमेदवारी नाकारली तर त्यांच्या शब्दाला किंमत राहिल, असंही वैभव नाईक यांनी म्हटलंय. www.konkantoday.com