महाड दुर्घटनेतून पंधरा जणांना वाचवणारा देवदुत स्वप्नील शिर्के

महाडमधील दुर्घटनेत चार जणांचा जणाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं काहीजणांना वाचविण्यात यश आलं आहे. अपघाताच्या आधी काही मिनिटं ही इमारत हलत होती. त्याचवेळी याच इमारतीत राहणाऱ्या स्वप्नील शिर्के या तरुणाने प्रसंगावधान राखत 15 लोकांना इमारतीच्या बाहेर काढलं. त्यामुळे त्या सगळ्यांचे प्राण वाचले. यात स्वप्निल मात्र जखमी झाला आहे. त्याच्यावर रानडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दोन मिनिटे जरी उशीर झाला असता तर ते सगळे ढिगाऱ्याखाली अडकले असते असंही त्याने सांगितलं.
स्वप्निल बाहेर पडत असतांनाच सिमेंटचा एक तुकडा आदळला आणि त्याच्या पायाला लागला व तो जखमी झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button