
कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव
कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बड्या राजकीय नेत्याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ आता एका खासदारालाही करोनाची लागण झाली आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा करोना तपासणीचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक व त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
www.konkantoday.com