कोरोनाच्या च्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनांना बंधने मात्र एसटीची नियम डावलून वाहतूक
रत्नागिरी जिल्हा अंतर्गत व राज्यात आता एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे एस टी ला प्रवास करताना e-pass चे बंधन नसले तरी सुरक्षित अंतराचे नियम पाळण्याची सक्ती व सॅनेटरी बाबतची सक्ती व प्रत्येक बस प्रवासानंतर सेनेटरआईज करण्याची नियम घालण्यात आले आहेत रत्नागिरीतील संकल्प युनिक फाउंडेशन चे उपाध्यक्ष शकिल गवाणकर यांनी रत्नागिरी ते चिपळूण असा बसने प्रवास केला त्यामध्ये एसटीकडून कोरोना च्या बाबतीत एसटीकडून नियम पळत नसल्याचे त्यांना आढळून आले एसटीने प्रवास करताना केवळ बावीस प्रवासी व एका सीटवर एक प्रवासी असा घ्यायचा असा नियम आहे मात्र प्रत्यक्षात रत्नागिरी चिपळूण गाडीत काही सीटवर दोन प्रवासाची ही बसले होते एवढेच नव्हे तर ही गाडी संगमेश्वरला आल्यावर त्या ठिकाणी गर्दी झाल्यावर या गाडीत उभ्याने ही प्रवाशांना घेण्यात आले एसटी विभागाकडून असे नियम डावलून वाहतूक केली जाणार असेल तर ते प्रवाशांच्या जीविताच्या दृष्टीनेही धोकादायक आहे शिवाय यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे एकीकडे शासन खाजगी गाड्यातून येणाऱ्या लोकांना e-pass व कोरोना तपासणीचे बंधन घालीत आहे तर दुसरीकडे नियम डावलून एसटीची वाहतूक सुरू राहिली तर नियमाना व बंधनांना अर्थ राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन व एसटी प्रशासनाने तातडीने लक्ष घालने जरुरीचे आहे
www.konkantoday.com