सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे बहुतांश निर्णय मागे घेतले जाण्याची शक्यता
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊनचे बहुतांश निर्णय मागे घेऊन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत लॉकडाऊन प्रश्नी विचारविनिमय होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसंच बुधवारी होणाऱ्या बैठकीत खासगी वाहनांना ई पास कायम ठेवायचा की, नाही याबद्दल निर्णय होण्याचीही शक्यता आहे.
मुंबईची लाइफलाइन असलेली उपनगरी लोकलसेवा सध्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com