पंतप्रधान स्वनिधी योजनेत मच्छी विक्रेत्यांचा समावेश करण्यास मान्यता
देशभरात लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार थांबून रोजगारावर गंडांतर आले आहे. त्यातून फेरीवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळावे, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली.या योजनेत मच्छी विक्रेत्यांचाही समावेश करण्यावर केंद्र सरकारकडून पावले उचलली जात आहेत. फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्जरुपाने देणाऱ्या या योजनेत मच्छी विक्रेत्यांचा, विशेषत: महिला मच्छी विक्रेत्यांचा समावेश करण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. ही मागणी तातडीने मान्य केली असून केवळ मच्छी विक्रेतेच नव्हे, तर रस्त्यावर विक्री करणाऱ्या अन्य श्रेणींतील फेरीवाले व महिला बचत गटांनाही गरजेनुसार या योजनेत समाविष्ट करण्याची मुभा देण्यात आली आहे.
www.konkantoday.com