देवरुख येथे देवधामापूर याठिकाणी भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाने बिबट्याचा सुरक्षित बाहेर काढले
देवरुख येथील देव धामापूर येथील पाष्टे वाडीतील गणपत पाष्टेयांच्या विहिरीत रात्री एक बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला सकाळी विहिरीतून आवाज येऊ लागल्याने घरातील लोकांनी पहिले असता बिबट्या पडलेला दिसला याची खबर वनविभागाला देण्यात आली वन अधिकारी प्रियांका लगड ,वनपाल सुरेश उपरे ,वनरक्षक बाबु गावडे ,शर्वरी कदम, मिलिंद डफळे आदींचे पथक घटनास्थळी आले त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले बिबट्या विहिरीत पडल्याचे घटना कळल्यावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती
www.konkantoday.com