चिपळूण गुहागर रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचार्यांला धडक दिल्याने पादचाऱ्यांचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील चिपळूण गुहागर रस्त्यावर भराडे वाडी येथे आपल्या घरी परतणाऱ्या मनोज खातू यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला मनोज खातू भराडे वाडी उमरोली तालुका चिपळूण हे आपल्या घरी जाण्यासाठी चिपळूण ते गुहागर रोड वरुन पायी चालत येत होते रस्ता ओलांडत असताना या रस्त्यावरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली त्यांचा जागीच मृत्यू झाला ठोकर दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे
www.konkantoday.com