
गुरुवार २७ पासून गुरुवार ३ सप्टेंबर पर्यंत देवरुख बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय
देवरुख बाजारपेठेतील युवा व्यापारी शैलेश भोजने यांचे आकस्मिक निधन झाले या घटनेने देवरुख शहर हळहळले आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार २७ पासून गुरुवार ३ सप्टेंबर पर्यंत देवरुख बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
देवरुख नगरपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून व्यापारी, नागरीक, संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी बोलवले होते.याच बैठकीत शहरवासियांच्या आरोग्याच्या काळजीसाठी कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी आठ दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे व व्यापारी वर्गाने मोठी गुंतवणूक केली आहे याचा विचार करून गुरुवार पासून हा लॉकडाऊन होणार आहे.
www.konkantoday.com