सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात गणेशोत्सव सुरू
मालवण किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात गेली 340 वर्षे सुरू असलेला गणेशोत्सव याहीवर्षी मोठ्या आनंदोत्सवात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळापासून किल्ले सिंधुदुर्ग येथे गणेशोत्सव सुरू केला असल्याचे किल्लावासीय सांगत आहेत. हा उत्सव दरवर्षी पाच दिवस साजरा केला जातो.
यावर्षी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमांचे पालन करून शिवराजेश्वर मंदिरात गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
www.konkantoday.vom