
राज्यात काल दिवसभरातून ९ हजार २४१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे काल १४ हजार ४९२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर २९७ कोरोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरातून ९ हजार २४१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात काल ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत.
www.konkantoday.com