राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला दिला घरचा अहेर
राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही राज्याती ल कृषी खातं झोपलं आहे की काय’, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिली आहे.विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
www.konkantoday.com