राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरु,मनसे नेत्यांचा गंभीर आरोप

कोरोना काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरु आहे असा घणाघाती आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोरोना सेंटरच्या नावाखाली शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरु आहे याचा जाब मनसे विचारणार असं त्यांनी सांगितले मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेचे आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे.
मी, माझं आणि मलाच; आई बबड्यासाठी एवढं तर करणारच, असं ट्विट करत संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.वरळी भागातील कोरोना सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली होती. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button