
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले!, 15 ला मतदान तर 16 जानेवारीला लागेल निकाल!
राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी – ३ जानेवारी
मतदानाचा दिनांक १५ जानेवारी २०२५
मतमोजणीचा दिनांक १६ जानेवारी २०२५
आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. ही आचारसंहिता ही डिझास्टरसाठी आडकाठी राहणार नाही.
एकूण महानगर पालिका – २९
एकूण जागा – २,८६९ जागांसाठी
महिला – १, ४४२
जाती – ३४१
अनूसूचित जमाती – ७७
नागरिकांचा मागास प्रवर्ग – ७५९
1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार!
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल, असे ते म्हणाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून २०० पेक्षा अधिकारी आहेत, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकार ७०० पेक्षा जास्त अधिकारी नेमण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार कर्मचारी निश्चित करण्यात आले.
मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी प्रचाराला निर्बंध राहतील.
28 महापालिका या बहुसदस्यीय!
बृहन्मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकांत एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचेत. काही प्रभागात 5 व काही ठिकाणी 3 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महापालिकांत मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 मते द्यावे लागतील, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.




