
तडफडत असलेल्या म्हशीला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा शॉक लागून मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी कारिवडे पेडवेवाडी येथे तडफडत असलेल्या म्हशीला वाचविण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा शॉक लागून मृत्यू झाला. सुनील श्रीराम सावळे (वय 32, रा. कारिवडे पेडवेवाडी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
सकाळी सुनील सावळे यांच्या शेत मांगराजवळ एक म्हैस तडफडत असल्याची त्यांचा भाऊ परमेश्वर सावळे यांना दिसून आले. याबाबत त्यांनी भावाला कल्पना देण्यासाठी हाक मारली. सुनील घराबाहेर येऊन म्हैस कशामुळे तडफडत आहे, हे पाहण्यासाठी म्हशीजवळ गेले. म्हशीला स्पर्श करताच त्यांना विजेच्या धक्का बसला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com