
कोकणातील विद्यार्थ्यांसाठी NEET परीक्षेचे सेंटर सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातच करावे,माजी मंत्री सुरेश प्रभू यांची मागणी
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या NEET परीक्षेचे ऐकही सेंटर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये नाही आहे.आता या संदर्भात कोकणाचे सुपुत्र व माजी मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोक्रिया यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले आहे व या दोन्ही जिल्ह्यात सेंटर सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे.या पत्रात त्यांनी म्हटले आहे की देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात एकही सेंटर नाही.या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गोवा राज्य हेच नजीकचे केंद्र आहे.यामुळे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करून आपल्या पालकांसह प्रवास करावा लागत आहे तसेच कोवीडच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या कोरोना टेस्ट व क्वारंटाइनचे पालन देखील करावे लागत आहे.या सगळ्यामुळे विद्यार्थी व पालकांवरील नैतिकतेवर परिणाम होत आहे.सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांची ही चिंता लक्षात घेता व त्यांना त्यांच्या मूळ जागेवरुन NEET परीक्षेत भाग घेण्यासाठी समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी
मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सिंधुदुर्ग (शक्यतो कुडाळ किंवा कणकवली) आणि रत्नागिरी जिल्ह्यात नीट (NEET) सेंटर घोषित करावी म्हणजे याचा उपयोग स्थानिक विद्यार्थ्यांना होईल व त्यांना दुसऱ्या राज्यात प्रवास करण्याच्या मानसिक तणावातून तसेच कोविड 19 निर्बंधांनपासुन वाचवेल.अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
www.konkantoday.com