
डेरवण क्रीडा संकुलात १४ व १५ रोजी राज्यस्तरीय युवा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि चेसमन रत्नागिरी यांच्या तांत्रिक सहकार्याने डेरवण येथील “श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात” पहिली राज्यस्तरीय युवा बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि १४ आणि १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षाखालील स्पर्धेत रोख रुपये पन्नास हजारांची बक्षिसे आणि पदके डेरवण ट्रस्टतर्फे विजेत्या खेळाडूना देवून गौरविण्यात येणार आहे. ७, ९, ११, १५ आणि १३ वर्षाखालील मुलांमुलींच्या गटातील विजेत्यांसाठी ऑलिम्पिक पदकांची आठवण करून देणारी पदकेही देवून गौरविण्यात येणार आहे. मुलींच्या गटात खास उत्तेजनार्थ बक्षीसेही देण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंच्या कलागुणांना पैलू पडण्याचे काम विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट गेली अनेक वर्षे करत आली असून स्पोर्ट्स अकॅडमी चे अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. बुद्धिबळ खेळाचा रत्नागिरी जिल्ह्यात प्रसार व्हावा म्हणून चेसमेन रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना सदैव प्रयत्नशील असतात. त्यांच्या ह्या कार्यात हातभार लागावा आणि जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना जिल्ह्यातील तसेच बाहेरील खेळाडूंशी खेळण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अकॅडमी च्या श्रीकांत पराडकर यांनी सांगितले.
खेळाडूंच्या निवासाची तसेच भोजनाची सोय क्रीडा संकुलात माफक दरात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा तसेच स्पर्धकांनी नावनोंदणी साठी श्रीकांत पराडकर, विवेक सोहनी तसेच चैतन्य भिडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे
www.konkantoday.com