अहमदनगर मध्ये भारतीय एकात्मतेचे दर्शन, मुस्लिम मामाने मानलेल्या हिंदू भगिनींच्या मुलींचे केले कन्यादान
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाची चर्चा शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने हिंदू समाजातील मानलेल्या बहिणीच्या मुलींचे कन्यादान केलंय.शेवगाव तालुक्यातीक बोधेगाव येथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आईवडिलांकडे राहत आहेत. तिथेच त्यांनी त्यांच्या मुलींना मोठे केले. तसेच या महिलेला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिलीय.
www.konkantoday.com