
संजीवन प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित दुर्गोत्सवात छोटे किल्लेदारांनी साकारले ४५ किल्ले
संजीवन प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित दुर्गोत्सव २०२५ अंतर्गत छोटे किल्लेदार स्पर्धेतयंदा मुलांनी उत्साह दाखवला. हरचेरी, चांदेराई, कोंडवी, उमरे, लावगणवाडी, टिके कांबळेवाडी, फुटकवाडी आणि झरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या ४५ सुंदर प्रतिकृती तयार करून इतिहास आणि संस्कृतीशी आपले नाते प्रदर्शित केले.
भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सातव्या वर्षी आयोजित झालेल्या या उपक्रमात मुलांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून आपली प्रतिभा सादर केली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलांमध्ये इतिहासाची ओळख निर्माण करणे, सुट्टीमध्ये मोबाईलपासून दूर राहून कलात्मकता जोपासणे, गड-किल्ल्यांची माहिती मिळवणे आणि नवीन पिढीत संस्कृतीसंबंधी आवड निर्माण करणे असा आहे.
एकूण ४५ किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार झाल्या. त्यात तोरणा, राजगड, रायगड, शिवनेरी, वासोटा, मुरूड, जंजिरा, पद्मावती, सिंधुदुर्ग, प्रतापगड असा विविध किल्ल्यांचा समावेश आहे. या उपक्रमातून मुलांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली असून, इतिहास आणि संस्कृतीची ओळख प्रस्थापित करण्यास मोठा हातभार लागला आहे.www.konkantoday.com




