
चॅम्पियन रेनी ट्रॉफी मध्ये आज रंगणार सुपर फायटर्स व सुपर वॉरियार्स मध्ये प्रदर्शनीय सामना
प्रतीक साळवी व विराज साळवी यांच्या नेतृत्वाखाली या सामन्यात जून्या व नवीन खेळाडूचा समावेश असणार आहे.
जुना अष्टपैलू डावखुरा खेळाडू प्रवीण साळवी, एकेकाळचा फलंदाजाचा कर्दनकाळ कुणाल सावन्त, मनीष आयरे,राज चव्हाण, रजनीश परब व नवीन दमाचे अभी दुडे ,दीपक माणगावकर,तेजस हळदवणेकर,यश खानविलकर आणि विभास दाभाडे ( Young Blood ) असा नव्या जुन्याचा समावेश या दोन्ही संघात असणार आहे.
नवीन खेळाडू जून्या खेळाडूपुढे कसा कस लावतात हे पहाणे महत्वाचे ठरेल.
रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमिना उत्सुकता असणार आहे ती मनिषचीं बॅट पुन्हा तळपणार का? कुणाल सावन्त पुन्हा एकदा गोलंदाजी आग ओकणार का? तसेच या सामन्यात न्यू प्रेसिडेंसीचा यष्टीरक्षक रजनीश पुन्हा यष्टीरक्षण करताना दिसेल का?
अभि दुडये मैदानात नवीन खेळाडूंना घेऊन कोणता प्लॅन आखणार हे पहाणे सुद्धा तितकेच महत्वाचे.
तर हे सर्व बघण्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमी प्रमोद महाजन संकुल येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करणार यात शन्का नाही.
दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत त्यामुळे सामना चुरशीचा होणार .
हे संघ खालील प्रमाणे राहतील.

प्रतीक साळवी
सुपर फायटर्स
- प्रतिक साळवी (कर्णधार/ऑल राउंडर)
- अभी दुडे (ऑल राउंडर)
- प्रवीण साळवी (ऑल राउंडर)
- रोहित मायनांक (बॉलर)
- शुभम सावंत (बॉलर)
- कुणाल सावंत (बॉलर)
- प्रथमेश साळवी
- लोभस देसाई
- सर्वेश शेलार
- किरण कामतेकर
- दिपक माणगावकर
- महेश सामंत

विराज साळवी
सुपर वॉरियर्स
- विराज साळवी (कर्णधार/ऑल राउंडर)
- तेजस हळदवणेकर (ऑल राउंडर)
- सुजित साळवी (बॅटर)
- सौरभ झापडेकर (बॅटर)
- शुभम सावंत (बॉलर)
- राज चव्हाण (ऑल राउंडर)
- मनीष आयरे (बॅटर)
- विभास दाभाडे
- विराज दाभाडे
- आराध्य वर्तक
- यश खानविलकर (बॉलर)
- रजनीश परब




