
पैसा फंड इंग्लिश स्कूल दहावीचा निकाल ९८ टक्के
संगमेश्वर दि. २१ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले आहे.दहावी परीक्षेसाठी ९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. एकूण ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा एकूण निकाल ९७ : ८९ टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक – मुंडेकर शिवम संतोष ८९:८० टक्के , द्वितीय क्रमांक – आखाडे सुजल मधु ८९ टक्के, तृतीय क्रमांक – घाणेकर दीक्षा मंगेश – ८७:६० टक्के, चतुर्थ क्रमांक – गीते स्नेहल सचिन ८७:२० टक्के, पाचवा क्रमांक – मुंडेकर तन्मय रवींद्र ८६.८० टक्के