
कोकणात गणपती बाप्पाचे घराघरात मोठ्या उत्साहाने स्वागत.
कोकणातील महत्त्वाचा सण असलेल्या गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे जिल्हा भरात घरोघरी गणेश आगमानाला सुरूवात झाली सध्या कोकणात पावसाळी वातावरण असले तरी मोठ्या प्रमाणावर उघडी कही आहे त्यामुळे अनेक गणेश भक्तानी काल चतुर्थीच्या आदल्याच दिवशी श्रीगणेश मूर्ती आपल्या घरी वाजत गाजत आणत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहयला मिळत आहे. काही सार्वजनिक उत्सव मंडळानेही चतुर्थीच्या आदल्या दिवशीच गणेशमूर्ती आणल्या आज सकाळपासून पावसाने उघडीत घेतल्याने अनेक गणेश भक्तांनी आजही गणपती बाप्पांना आपल्या घरी नेले रत्नागिरीतील जुवे व आंबे शेत मंडळाच्या मिरवणुकी देखील निघाले आहेत त्यामुळे कोकणात मोठे उत्सवाचे वातावरण असून बाजारपेठात विशेषता मिठाईच्या दुकानात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे