स्वच्छ सर्वेक्षण लीग २०२० अंतर्गत खेड नगर नगरपालिकेची लक्षणीय कामगिरी ,स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नववे मानांकन

खेड : २५००० पर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांच्या वर्गातील नगर पालिकांमध्ये देशातील वेस्ट झोन मधील महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यांमधून खेड नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ९ वे मानांकन प्राप्त झाले आहे. खेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे परिश्रम अधिकारी, लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि नागरिकांचे सहकार्य यामुळेच खेड नगरपरिषदेला हा बहुमान प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षानी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण लिग २०२० मध्ये खेड नगर परिषदेने सहभाग घेतला होता. या अभियानातंर्गत खेड नगरपालिका प्रशासनाने शहरातील स्वच्छतेवर विशेष भर दिला होता. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याबाबतचे वेगवेगळे उपक्रम या दरम्यान राबविण्यात आले होते यामध्ये खासगी संस्थेमार्फत घरोघरी जावून नागरिकांचे प्रबोधन करणे, जनजागृती रॅलींचे आयोजन करणे, सार्वजनिक शौचालये, बगीचे आदींच्या भिंतीवर स्वच्छतेचे संदेश देणारे स्लोगन्स लिहिणे, शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करणारे मोठमोठे फलक लावणे, गटारांमधील कचरा थेट नदीत जावू नये यासाठी गटारांच्या तोंडावर लोखंडी जाळ्या बसवणे, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणे, शहरातील बांधकाम कचरा गोळा करण्यासाठी खास घंटा गाडी फिरवणे, व्यापारी क्षेत्रामध्ये कचरा कुंड्या ठेवून त्या कुंड्यातील कचऱ्याची रोजच्या रोज विल्हेवाट लावणे, रहिवासी क्षेत्रामध्ये दर दिवशी दोन वेळ साफ-सफाई करणे, ओला व सुका कचरा वेगळा करून नागरिकांच्या घरातून तो रोजच्या रोज घेऊन त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे या कामांचा समावेश होता. या कामांचे केद्रीय सर्व्हेक्षण समितीकडून सव्हेक्षण करण्यात आले होते.
या अभियानातंर्गत महाराष्ट्रातील ३८४ शहरामधील फक्त ३४ शहरांना कचरा मुक्त शहर म्हणून तीन स्टार मानांकनाचा दर्जा देण्यात आला असून त्यामध्ये खेड नगरपरिषदेचा समावेश आहे. यापुर्वी ही खेड नगर परिषदेला कचरा मुक्त शहर म्हणून तीन स्टार मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला होता तसेच हागणदारी मुक्त शहर म्हणून ODF+ चा दर्जा सुद्धा प्राप्त झाला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button