लोटे औद्योगिक वसाहतीतील फिल्ट्रा कंपनीला युवा सेनेचा दणका,स्थानिक उच्च शिक्षितांना कायम स्वरुपी नोकऱ्या देण्याची मागणी
खेड : उच्च शिक्षित स्थानिक युवकांना ठेकेदार पद्धतीने कामावर घेऊन त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील फिल्टा कंपनी व्यवस्थापनाला युवा सेनेने चांगलाच दणका दिला. स्थानिकांच्या भावनांशी खेळाल तर गाठ युवा सेनेशी आहे असा इशारा यावेळी देण्यात आला.
लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये उच्चशिक्षित स्थानिकांना नेहमीच दुजाभाव दिला जातो. येथील युवकांना ठेकेदारी पद्धतीने कामावर घेतले जाते तर बाहेरून आलेल्यांना नेहमीच कंपनीत कायम स्वरुपी नोकरी दिली जाते. स्थानिक उच्च शिक्षिरतांना डावलून बाहेरून आलेल्या संधी देणे हा स्थानिकांवर अन्याय असल्याने या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्धार आता युवा सेनेने केला आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील फिल्ट्रा या कंपनीत बीएस्सी, मेकॉनिकल इंजिनिअर डिप्लोमा, डिग्री होल्डर स्थानिकांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले जाते तर बाहेरून आलेल्यांना कंपनीत कायमस्वरुपी नोकरी दिली जाते अशी तक्रार युवा सेनेकडे आली होती. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी युवा सेना जिल्हा अधिकारी अर्जिक्य मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सैनिकांनी फिल्ट्रा कंपनीच्या व्यवस्थापनाला धडक दिली.
आपल्या पाल्याला उच्चशिक्षित करण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करतात मात्र त्यांना नोकरी देताना कंपन्याकडून दुजाभाव केला जातो. स्थानिकांवरचा हा अन्याय युवा सेना कदापी सहन करणार नाही. जर तसा प्रयत्न झाला तर युवा सेनेच्या माध्यमातून कंपनीवर धडक मोर्चा काढला जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
www.konkantoday.com