पहिल्याच दिवशी १० बसेस जिल्ह्याबाहेर, सिंधुदुर्गामधून सहा गाड्या रत्नागिरीत दाखल
कोरोना रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक गुरूवारपासून सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातून टप्प्याटप्प्याने ही वाहतूक सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी रत्नागिरीतून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दहा गाड्या सोडण्यात आल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६ गाड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत.
www.konkantoday.com