गणेश विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची फिरत्या कृत्रिम तलावाची नवी संकल्पना

चिपळूण- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषदेने गणेश विसर्जन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना आणली आहे. त्यामुळे विसर्जनला होणारी गर्दी टाळता येणार आहे व संभाव्य धोकाही टळणार आहे.
गणेश विसर्जन प्रसंगी मिरवणूकीस़ पूर्णतः बंदी आहे.नागरिकांनी गणेश घाटावरही विसर्जनास येवू नये असे आवाहन प्रशासननाने केले आहे. मात्र गणेशभक्तांची, नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी फिरता कुत्रिम तलाव हा उपक्रम अमंलात आणला जाणार आहे. यातूनच गणेश विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबवली जाणार आहे. यासाठी नगरपालीकेच्या आठ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे व या गाड्यांमध्येच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांना सजावट, रोषणाई करण्यात येणार आहे. या गाड्या प्रत्येक प्रभागात जातील. त्या मुख्य ठीकाणी उभ्या राहतील व नगरपालीकेच्या छोट्या गाड्याव्दारे या श्रीगणेश मुर्ती घराघरांतून घेतल्या जातील व कृत्रिम तलाव तयार असलेल्या गाडीमध्ये आणून विसर्जन केले जाईल. या कृत्रिम तलावात निर्माल्य कळशाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.शक्यतो नागरिकांनी सायंकाळी सात पर्यंत विसर्जनासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी हेल्प लाईन क्रमांक ०२३५५ २६१०४७ ४८ संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी वैभव विभाते व प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button