
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य- उच्च न्यायालयाचा निर्वाळा
करोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य असून त्यातून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
सरकारतर्फे घालण्यात आलेले निर्बंध हे देशात कुठेही प्रवास करण्याच्या आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करत संतोष गुरव यांनी सरकारच्या ७ ऑगस्टच्या निर्णयाला आव्हान दिले होते. विलगीकरणाची अट ही अशास्त्रीय असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता.
www.konkantoday.com