कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी
कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली आहे.
‘कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही’ असे नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
,www.konkantoday.com