औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार
औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स लिमिटेडच्या (डब्लूसीएल) खाणीतील उच्च दर्जाच्या कोळशाची विक्री इतर राज्यांना करण्यात येते. मात्र कमी दर्जाचा कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना देण्यात येत असल्याने यातून जास्त राख निर्माण होत आहे. लवकरच सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्राची तपासणी करण्यात येणार असून त्यातून निर्माण होणाºया प्रदूषणाची माहिती घेतली जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
www.konkantoday.com