आंतर जिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्याची अचानक घोषणा झाल्याने पहिल्या दिवशी अधिकार्यांची धावपळ आणि संभ्रमाचे वातावरण
पुरेशा तयारीविना आंतरजिल्हा एसटी वाहतूक सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्याने वेळापत्रक तयार करताना कर्मचारी, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.कमी गाडय़ा, मनुष्यबळ, बंद संगणकीय आरक्षण, विस्कळीत वेळापत्रकाचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसला.
करोनाची चाचणी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करुनही कोकण प्रवासासाठी २१ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक असल्याचे प्रवाशांना काही आगार, बस स्थानकात सांगितले जात होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमही निर्माण झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले
www.konkantoday.com