
रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका येथील अनधिकृत रिक्षा स्टॉप हटविण्याची मागणी
रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका येथील अनधिकृत रिक्षा स्टॉप हटविण्याच्या मागणीचे निवेदन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष उदय पेठे यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना दिले आहे. अनधिकृत रिक्षा स्टॉपमुळे राधाकृष्ण नाक्यासह बाजारपेठ परिसरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. व्यापारी, वाहनचालक, सर्वसामान्य नागरिक आदींना अनधिकृत रिक्षा स्टॉपचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राम आळीपासून विठ्ठल मंदिर, राधाकृष्ण नाका ते मच्छिमार्केट या परिसरात रस्ते अत्यंत अरूंद आहेत. अरूंद रस्त्याच्या दुतर्फा फळविक्रेत्यांच्या गाड्या उभ्या केल्या जात आहेत. राधाकृष्ण नाका ते गोखले नाका रस्त्यावरील अनधिकृत रिक्षा स्टॉपमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनधिकृत रिक्षा स्टॉप हटविला तरच वाहतूक कोंडीची समस्या सहजपणे सुटू शकेल असा विश्वास उदय पेठे यांनी अनिल विभुते यांना दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com