महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमधील तीन ब्लॉकला देण्यात येणार
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महान फलंदाज दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डमधील (पूर्वेच्या दिशेकडील) तीन ब्लॉकला देण्यात येणार आहे. देशासाठी 116 कसोटी खेळणाऱया महान खेळाडूचा सन्मान करण्यात यावा यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होतात्याला यावेळी मान्यता देण्यात आली. .
www.konkantoday.com