
फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे वृक्षलागवड
फिनोलेक्स कंपनी, मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षलागवड अभियान यशस्वीरित्या पूर्ण केले.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवडीचा पर्याय स्विकारण्यात आला आहे. मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे हे अभियान राबविण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पर्यावरण रक्षणाची खूप मोठी जबाबदारी सर्वांवर आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. मुकुल माधव विद्यालयातर्फे गेल्या वर्षीही झाडांना विद्यार्थ्यांची नावे देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. पर्यावरण रक्षणासोबत शाळेशी अतूट नाते निर्माण झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
www.konkantoday.com