
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाची कोविड सेंटर बंद करणे बाबत तहसीलदारांना निवेदन
देवरुख:- बाहेर गावाहून गणेशोत्सवासाठी आलेल्या नागरीकांना क्वाॅंरटाइन म्हणून देवरुख हायस्कूल येथे ठेवण्यात येत होते. या कोविड सेंटरला देवरूख गीतेवाडी ग्रामस्थ व स्वस्तिक युवा प्रतिष्ठानने विरोध केला होता. याची दखल घेऊन संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनीच हे सेंटर बंद करावे, असे निवेदन तहसीलदार सुहास थोरात यांचेकडे दिले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातुन देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाने शासनाची विनंती मान्य करुन न्यू इंग्लीश स्कुल, काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात कोविड सेंटर उभारण्यासाठी मान्यता दिली होती
www.konkantoday.com