जि प मधील विनंती बदल्या बाबत अद्याप निर्णय नाही
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने कोरोनातील परिस्थितीमुळे रद्द करतानाच विनंती बदल्यां करण्याचे निर्देश दिले होते; परंतु गेल्या आठ दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ती प्रक्रिया करावयाची की नाही याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. तत्पुर्वी जिल्ह्यातील सुमारे चारशे शिक्षकांनी बदल्यांसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज केले आहेत.
www.konkantoday.com