गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील प्रमुख रस्ते, चौक व गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण नगरपरिषदेने करावे – ॲड. दीपक पटवर्धन
गणपती सणानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गर्दी शहर परिसरात, बाजारपेठेत झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता कमी करण्यासाठी रत्नागिरी शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते, चौक, गृहनिर्माण संस्थांच्या इमारती यांचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. ऐन सणाच्या दिवसात चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. स्वच्छतेचे महत्व दुर्लक्षित होऊन चालणारे नाही. कोरोना महामारी विरुद्ध लढताना निर्जंतुकीकरण करण्याचा उपक्रम नगरपरिषदेने राबवावा. याबाबत तात्काळ निर्णय करावा. गर्दी लक्षात घेऊन नगर प्रशासन संपूर्ण शहरात ही मोहीम राबवेल ही अपेक्षा होती. मात्र अद्यापपर्यंत सार्वत्रिक निर्जंतुकीकरण कार्यक्रम नगरपरिषदेच्या पटलावर दिसत नाही. म्हणून आपण ही मागणी आज २०/०८/२०२० रोजी ‘नगरपरिषद अध्यक्ष श्री. साळवी साहेब’ तसेच ‘मुख्यअधिकारी नगरपरिषद’ व ‘जिल्हाधिकारी रत्नागिरी’ यांचेकडे पत्र देऊन करीत आहोत. अशी माहिती भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली आहे.
www.konkantoday.com