
अभाविपचे मुंबई विद्यापीठ विरोधात भीक मागो आंदोलन
अखिल भारतीय विद्याथी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा विभागातर्फे काल मुंबई विद्यापीठाविरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.
करोनाच्या काळात अनेक जणांना आर्थिक झळ बसली आहे. व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना कॉलेज फी भरण्यात सवलत मिळावी, ही अभाविपची मागणी आहे. त्याकरिता अभाविपच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा शाखेने आज आंदोलन केले. शैक्षणिक शुल्क ४ टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. विद्यार्थी ज्या सोयीसुविधांचा वापर करत नाहीत, त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये.ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे, या मागण्यांसाठी रत्नागिरी एसटी बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी अभाविप दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक राहुल राजोरिआ, जिल्हा कार्यकारणी सदस्य ईशा फाटक, रत्नागिरी तालुका प्रमुख स्वरूप काणे हे कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com